Satara News महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी


मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा महिला दिनानिमित्त सत्कार
 

सातारा : मतदान प्रक्रियेत महिला आणि पुरुषांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक महिला दिनानिमित्त मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाNया महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सत्कार आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते.

महिला बीएलओंचे चांगले काम

मतदान प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग रहावा यावर निवडणूक आयोगाचा भर राहिला आहे. महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदार नोंदणी कामात चांगले काम केले आहे. मतदार नोंदणी करताना मतदानाचे महत्त्वही पटवून सांगावे, असे आवाहन करून, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

महिला व पुरुष असा भेद न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. महिला मतदारांनी मतदार नोंदणी करुन मतदान करणे महत्त्वाचे आहे. वर्षातून १ मतदार यादी प्रसिद्ध होते. या मतदार यादीत आपली नावे आहेत का याची खात्री करावी. लोकशाहीचा आत्मा हा मतदार असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रास्ताविकात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या