Satara News : सुरेश चिंचकर यांना समाजभूषण पुरस्कार


समाजहिताला प्राधान्य देवून काम करणार्‍या कुशल संघटकाचा गौरव

Satara News : सातारा जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या दै. ऐक्यचे जाहिरात व वितरण विभागप्रमुख सुरेश चिंचकर तथा भाऊ यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व वृत्तपत्र क्षेत्रातील उज्ज्वल कामकाजाच्या सन्मानार्थ श्री संताजी सेवक संस्था, महाराष्ट्र आणि तेली गल्ली मासिकाच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

समाजहिताला प्राधान्य देवून काम करणार्‍या समाजधुरिणांना प्रतिवर्षी समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहन देशमाने यांनी सांगितले.

अडचणीत धावून जाण्याचा स्वभाव

सुरेश उर्फ भाऊ चिंचकर यांनी सातारा जिल्ह्यात भक्कम समाज संघटन आणि समाज बांधवांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक, सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांशी आपुलकी व प्रेमाचे नाते निर्माण केले आहे. अडचणीत धावून जावून मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते समाजात लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचे उपाध्यक्ष प्रदीप उबाळे, सचिव आशिष खोंड यांनी सांगितले.

सुरेश चिंचकर यांच्याप्रमाणेच समाज संघटन व समाजसेवेत कार्यरत असणारे वसंतराव देशमाने (वाई), विक्रमशेठ सरजे (पैठण), बाळासाहेब पलटने (घोटी, नाशिक), शेजवळ सर (उंब्रज), श्रीमती पवित्रा अंबिके (पुणे), दिलीप दारुणकर (अहमदनगर), विलास काळे (यवतमाळ), अनुज हुलके (नागपूर), रमेश उचित (मालेगाव) आणि श्री संत संताजी महाराज संस्था (हडपसर, पुणे) यांनाही विविध पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संस्थेचे खजिनदार सुनील गडदे यांनी सांगितले. 

कोरोना प्रादुर्भाव कमी होताच हा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा पुणे परिसरात आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मोहन देशमाने यांनी केले आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन

दै. ऐक्यचे सल्लागार संपादक देवेंद्र पळणिटकर, संपादक शैलेंद्र पळणिटकर, दै. ऐक्य परिवारातील सर्व घटकांनी तसेच तीळवण तेली समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष हाडके, उपाध्यक्ष मनोज विभूते, जयसिंगराव दळवी, गजानन दळवी, मोहन विभूते, अनिल भोज,  अशोक भोज, अनिल क्षीरसागर, वसंत खर्शीकर, प्रदीप देशमाने, संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व चंद्रकांत चिंचकर, किशोरी चिंचकर, सीमा जवळकर, आसावरी इनामदार, विकास धुळेकर, सुरेश लोखंडे यांनी या पुरस्काराबद्दल सुरेश चिंचकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या