गोजेगाव व शेंद्रे येथील घटना; रोकड व साहित्य मिळून १५ लाखांवर डल्ला
Satara News : वीज वितरण कंपनीचे काम करणार्या एका कंपनीचे गोजेगाव आणि शेंद्रे (ता. सातारा) येथून लोखंडी खांब, रोकड, तसेच इतर साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील वैभव बर्गे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने विक्रांता इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी गोजेगाव आणि शेंद्रे (ता. सातारा) परिसरात विद्युत खांब उभारणीचे काम करत आहे. या कंपनीत चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील वैभव बर्गे आणि हुबळी येथील संदीप पावसकर हे दोघे कामास होते. या दोघांनी फेबु्रवारी तसेच मार्च महिन्यात वीज वितरणच्या कामासाठी आणलेले ३२ खांब, कंडक्टर, फॅब्रिकेशनचे साहित्य, बांधकाम साहित्य, मशिन्स, कर्मचारी तसेच इतरांच्या पगारासाठी आणलेली १ लाख ९३ हजारांची रोकड असा सुमारे १५ लाख २१ हजारांचा ऐवज चोरुन नेला.
सातारा तालुका पोलिसात तक्रार
साहित्य चोरीस गेल्याचे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्याची तक्रार रघुनाथ हेमंत दुबे (रा. पिरवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. यानुसार पोलिसांनी बर्गे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हवालदार मालोजी चव्हाण करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या