Satara News : मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय


शेतकर्‍यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी - वेदांतिकाराजे भोसले
 

Satara News : आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे मध संचालनालय (महाबळेश्वर), महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वाघेश्वरी अ‍ॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मधमाशा पालन करण्याबाबतची तांत्रिक प्रात्यक्षिके व जनजागृती या विषयावर आयोजित एकदिवसीय शिबिराच्या उदघाटनप्रसंगी वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, कृषी सहायक अधिकारी  हेमलता फडतरे, मधसंचालनालय महाबळेश्वरचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन. एम. तांबोळी, संभाजी शेळके, दिलीप शेळके, संतोष कदम आदी उपस्थित होते.

शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन 

डी. आर. पाटील यांनी प्रास्ताविकात मधमाशी पालन आणि त्याच्याशी निगडित शासकीय योजना याची सविस्तर माहिती दिली. शिबिरात मध योजना, शासकीय योजना, कृषी योजना, आत्मा योजना, निसर्गातील वसाहतींचे संकलन व संगोपन, मधाची गुणवत्ता व तपासणी याबाबतचे मार्गदर्शन आणि मधमाशा पालन याबाबत उपस्थित तज्ञ अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली. संशोधन अधिकारी रघुनाथ नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप साळुंखे यांनी आभार मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या