Satara News : जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण पुन्हा दीड हजारावर


कोरोनाने दोघेजण दगावले; नेरसह सातारा, कोरेगाव, फलटणही हिट लिस्टवर

Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

खटाव तालुक्यातील नेरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून सातारा, कोरेगाव, फलटण, मार्डी आदी ठिकाणीही कोरोनाने डोके वर काढले आहे. आजअखेर जिल्ह्यात केलेल्या चाचण्यांची संख्या साडेतीन लाखांच्या वर गेली असून हजारच्या खाली आलेल्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांच्या आकड्याने दीड हजार संख्येचा भोंज्या शिवला आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ४, शाहुपुरी ४, मंगळवार पेठ ४, शनिवार पेठ १, सदर बझार १, जकातवाडी १, पळशी ४, आसनगांव १.

कराड तालुका : कराड ३, शनिवार पेठ २, बेलवडे १, गमेवाडी १.

फलटण तालुका : फलटण ६, मलठण १, आनंदनगर १, स्वामी विवेकानंद नगर १, खुंटे १, गुणवरे २. 

जावली तालुका : कुडाळ १.

खटाव तालुका : पोखारळे २, पुसेगाव ३, नेर १२, निढळ १, मायणी ३, वडूज २, पळशी १, वर्धनगड २.

माण तालुका : सतरेवाडी १, मार्डी ६, मोगराळे १, विद्यानगर दहिवडी १, गोंदवले बुद्रुक १, दहिवडी ४.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ९, झरेवाडी १, पिंपोडे १.

खंडाळा तालुका : लोणंद १, शिरवळ १, शेडगेवाडी १.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.

जिल्ह्यात २ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय येथे दिडवाघवाडी येथील ५० वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दहिवडी (ता. माण) येथील ७४ वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ३५०४००
  • एकूण बाधित - ५९२६८  
  • घरी सोडण्यात आलेले - ५५९०९  
  • मृत्यू - १८५९
  • उपचारार्थ रुग्ण - १५००

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या