आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दीर, सासूसासर्यांवर गुन्हा दाखल
Satara News : वाठार स्टेशन येथील सोनाली विशाल माने (वय २२) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती विशाल, दीर प्रसन्न, सासू छाया, सासरे सतीश जगन्नाथ माने यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाठार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितास वाठार पोलिसांनी अटक केली आहे.
सोनाली माने हिचे तीन वर्षांपूर्वी विशाल सतीश माने याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ६ महिन्यांपासून तिला पती, दीर, सासू - सासरे वेळोवेळी जाचहाट व तिचा मानसिक छळ, तसेच मारहाण करीत होते. सोनाली यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे. सततच्या जाचहाटाला कंटाळून सोनालीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली.
पुढील तपास कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या