काळजातील माणुसकीच्या ओलाव्याचा प्रत्यय आणून देणारी शिराळ्यातील घटना
Shirala News : अपघात झाला असेल तर नागरिक मदतीसाठी यायला धजावत नाहीत, तर काहीजण व्हीडिओ करण्यात गुंग असतात. मात्र शिराळा (जि. सांगली) योथील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कदम यांनी, अपघात होऊन घायाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका दांपत्याला आपल्या रिक्षात बसवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, एवढेच नव्हे तर त्याने पैसेही घेण्यास नकार दिला. काळजातील माणुसकीचा प्रत्यय आणून देणारी ही घटना शिराळा येथे घडली. अशा या युवकाचा पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी स्वत: त्यास फेटा बांधून सत्कार केला.
तालुक्यातील भटवाडी येथून शेतातून विजय देशमुख व त्यांच्या पत्नी मोहिनी हे मोटरसायकलवरून येत असता त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. त्यावेळी तिथून आपल्या रिक्षामधून निघालेल्या शिवाजी कदम यांनी या दोघांना पाहिले. त्यांनी कोणताही विचार न करता या दोघा जखमींना शिराळा येथील डॉ. बी. बी. माने यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांची तब्बेत व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर ते बाहेर पडले. यावेळी जखमी कुटुंबीय गाडी भाड्याचे पैसे देऊ लागले. परंतु त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला व ते तेथून आपले नावही न सांगता निघून गेले.
अशाप्रकारे मदतीसाठी पुढे येणे आवश्यक
याबाबत जखमींचे वडील निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख यांनी दोन दिवस शोध घेतला व रिक्षाचालक शिवाजी कदम यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. शिवाजी यांच्या या चांगल्या कामाची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी या कामाचे कौतुक केले व अशाप्रकारे नागरिकांनी मदतीसाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांनी स्वत: शिवाजी यास फेटा बांधला व हंबीरराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी विशाल धस, राजू नलवडे, शंकर कदम, भटवाडीच्या पोलीस पाटील शुभांगी चव्हाण, निवास चव्हाण आदी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या