Wildlife News : मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर


रोहन भाटे, सुनील भोईटे यांना पुढील तीन वर्षांसाठी राज्यपालांकडून पुन्हा संधी

Wildlife News : राज्यपालांनी आज पुढील तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातून रोहन मधुकर भाटे व सुनील हणमंत भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वनांचे संरक्षण व्हावे, त्यांचे संवर्धन करता यावे त्याचबरोबर श्वापदांची शिकार, तस्करी रोखण्यासाठी मानद वन्यजीव रक्षकांना वन्यजीव खात्यातर्फे खास अधिकार देण्यात आले आहेत. वन, पर्यावरण, निसर्ग तसेच वन्यजीवांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात रोहन भाटे व सुनील भोईटे हे अनेक वर्षांपासून योगदान देत आहेत. 

रोहन भाटे यांनी २०१२ ते २०१७ अखेर मानद वन्यजीव रक्षक म्हणून कार्य केले आहे. तसेच २०१२ पासून ते केंद्र सरकारचा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सुनील भोईटे २०१५ पासून मानद वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेत राज्यपालांनी पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या