Mahavitaran News : आता ‘एसएमएस’द्वारे पाठवा मीटर रीडिंग


कोरोना संकटामुळे महावितरणकडून वीजग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध

Mahavitaran News : महावितरणने मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे. 

कोरोनाच्या दुसNया लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरु आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सोय कायम ठेवून महावितरणने आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील ग्राहकांना स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महावितरण तारखेपूर्वी एसएमएस करणार

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वत:हून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वत:हून मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. 

‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी श्READष्स्पेस्नष्१२ अंकी ग्राहक क्रमांक्नष्स्पेस्नष्ख्ेंप् रीडिंग ८ अंकापर्यंत असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३  या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे ख्ेंप् रिडींग ८९५० असे असल्यास श्READ १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे. 

  • वीजग्राहकांना स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. 
  • स्वत:हून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील.
  • वीज वापरावरदेखील नियंत्रण राहील. 
  • रीडिंगनुसार वीजबील आल्याची खात्री करता येईल. 
  • मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. 
  • वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. 
  • मीटर रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या