Sangli News : कोरोनावर औषधासाठी शिराळ्यात संशोधनकार्य


'आयसेरा बायोलॉजिकल' प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आयसेरा (ISERA) बायोलॉजिकल या कंपनीत कोरोनावर औषध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संशोधन प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

कोरोनावर सध्या लस आली असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी काही नविन औषध बाजारपेठेत येईल का याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. त्यादृष्टीने अनेक कंपन्या कोव्हीडवर संशोधन करत आहेत. अशाच पध्दतीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथेही संशोधन केले जात आहे.

संशोधन कार्याला दिल्या शुभेच्छा

शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल या अद्यावत औषध निर्मिती प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील अनेक कार्यक्षम तज्ञ युवक व युवती काम करत आहेत. आता ते कोव्हिडवर औषध तयार करण्याचे संशोधन करीत आहेत. या कंपनीला माझ्या शुभेच्छा, असे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या