Satara News : मसूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी


पोलीस, आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने फिरत्या पथकासाठी रूग्णवाहिका

Satara News : कराड तालुक्यातील मसूर येथे आता विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व मसूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने संचारबंदी लागू केली असतानाही लोक गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. ‘ब्रेक द चेन’ यशस्वी होण्यासाठी घरात थांबणे आवश्यक असुनही काहीजण विनाकारण बाहेर भटकत आहेत. त्यांना जरब बसवण्यासाठी त्यांना पकडून जागेवरच त्यांची तसेच कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी मसूर ग्रामपंचायतीची रूग्णवाहिका फिरत्या कोरोना चाचणी पथकाकडे आज सुपूर्द करण्यात आली. या पथकामध्ये दोन वैद्यकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश असेल. 

रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

या सेवेचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, मसूर प्राथमिक आरोग्य वेंâद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, डॉ. राजेंद्र डाकवे, मसूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, माजी सरपंच प्रकाश माळी, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिवंâदर शेख, विकास पाटोळे, सुरेश पाटील, पोलीस कर्मचारी, आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या