देवापूरच्या उध्दव बाबर यांनी सेंद्रीय खतांचा वापर करून पिकवला मधूर आंबा
Satara News : दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळवल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली असून हा आंबा निर्यातही होऊ लागला असल्याचे प्रशंसोद्गार माण - खटावचे प्रांताधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी काढले.
माण तालुक्यातील देवापूर येथील प्रगतीशील शेतकरी उध्दव बाबर यांनी संपूर्ण सेंद्रीय खताची मात्रा देत जोपासलेल्या आंबा बागेची पाहणी सूर्यवंशी यांनी केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
फळाच्या सुरक्षेसाठी विशेष आवरण
उध्दव बाबर यांनी लागवड केलेल्या केसर जातीची आंबा बाग यंदा फळांनी बहरली असून पक्षी, कीटक, ऊन, वारा, पाऊस व संभाव्य गारपिटीने आंबा फळास कोणतीही इजा होऊ नये, ते सुरक्षित राहावे व देश विदेशातील बाजारपेठेत विक्रीसाठी सर्व निकषासह गुणवत्तापूर्ण ठरावे यासाठी त्यांनी प्रत्येक झाडाच्या आंबा फळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कागदी पिशव्यांची आवरणे लावली आहेत. त्यांची पाहणी सूर्यवंशी यांनी केली.
तसेच बाबर यांनी पूर्णत: सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन जोपासलेल्या ऊसाच्या पिकाची व त्यापासून बनविलेल्या सेंद्रीय गुळ व काकवीची माहिती घेऊन त्यांनी शेतातच विविध प्रकारच्या सेंद्रीय खते निर्मितीच्या छोट्या प्रकल्पाचीही पाहणी करून प्रशंसा केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या