Satara News : आई शप्पथ... चोवीस तासात ५३२ रूग्ण वाढले


४ बाधितांचा मृत्यू; जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण ४ हजारच्या उंबरठ्यावर

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मागील चोवीस तासात तब्बल ५३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच काल रात्रीपासून ४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ३५, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, माची पेठ १, व्यंकटपुरा १, गडकर आळी १, भोसले मळा २, करंजे २, गोडोली ३, शाहूनगर २, सदर बझार १, गेंडामाळ १, शाहूपुरी ६, मोळाचा ओढा १, एमआयडीसी ४, देगाव फाटा २, कोडोली २, पीरवाडी २, कृष्णानगर २, विकासनगर १, प्रतापसिंहनगर १, कुस बुद्रुक १, जिहे १, देगाव १, खिरखिंडी १, वडूथ १, सोनगाव २, क्षेत्र माहुली ३, अंबवी १, लिंब १, मत्यापूर १, नागठाणे १, वर्णे १, पाडळी निनाम १, निगडी १, शेंद्रे १, कोंढवे २, सैदापूर १, कारंडवाडी १, वाढे १.     

कराड तालुका : कराड ४, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ ४, कार्वे नाका १, मलकापूर ५, कोयना वसाहत ३, आगाशिवनगर २, सैदापूर १, हेळगाव १, कालगाव १, हरपळवाडी १, वडगाव १, शिवनगर १, शेणोली १, वडोली निळेश्वर १, पार्ले १, ओगलेवाडी १, तांबवे १, तळबीड १, रेठरे १.

पाटण तालुका : कुंभारगाव १, सोनवडे १, कवडेवाडी १, कोयनानगर १, तामकने १, येरफळे ३, उमरकांचन १, गोषटवाडी १, मल्हारपेठ १, तारळे १, माजगाव १, दिवशी १.  

फलटण तालुका : फलटण ११, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ ३, कसबा पेठ ३, पवार गल्ली २, मलटण ८, रामनगर २, लक्ष्मीनगर ९, गोळीबार मैदान २, बिरदेवनगर १, जाधववाडी ४, कोळकी ४, सस्तेवाडी २, सरडे ८, सांगवी २, राजाळे २, विडणी ४, पिंप्रद १, हनुमंतवाडी १, किरवली १, साईनगर १, तरडगाव ५, वडजल ६, सासकल १, चौधरवाडी १, राजुरी १, ठाकुरकी १, खराडेवाडी १, शेनवडी १, निंभोरे १, झिरपेवाडी १, घाडगेमळा १.

खटाव तालुका : वडूज ३, खटाव १२, पुसेगाव १, औंध २, अंडोशी १, भोसरे २, भुरकवडी १, गुरसाळे ३, म्हासुर्णे २, कातर खटाव ६, तुपेवाडी २, बोंबाळे १, नेर १, रेवलकरवाडी १, ढोकळवाडी ३, कलेढोण ९, मायणी १, धोंडेवाडी १, पांगरखेल २, राजापूर ३, डिस्कळ १, गरवडी १, बुध ५, पळशी १, चोराडे १.  

माण तालुका : म्हसवड ११, मार्डी १, इंजबाव १, पळशी २, ढाले १, गोंदवले खुर्द १, गोंदवले १, कुडाळकर वस्ती १, टाकेवाडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ७, वाठार किरोली २, पिंपरी ४, कोंबडवाडी १, बोरगाव २, आर्वी १, गोलेवाडी २, कण्हेरखेड १, ल्हासुर्णे १, खेड १, दुधनवाडी ६, आसनगाव १, साप १.   

खंडाळा तालुका : शिरवळ १३, खंडाळा ५, भादवडे २, बावडा १, मोर्वे ३, म्हावशी १, आढवळी १, भादे १, लोणंद ४, पाडेगाव १, खेड १, मोरवाडी १, गुठळे ४, मिरजे १.

वाई तालुका : वाई ३, रविवार पेठ ५, गंगापुरी २, धर्मपुरी १, गणपती आळी ४, ब्राह्मणशाही १, सह्याद्रीनगर १, यशवंतनगर १, पांडेवाडी १, वयगाव १, बावधन ४, पसरणी २, वेळे ३, सुरुर २, ओझर्डे ३, शिरगाव १, देगाव २, भुईंज ६, अनवडी १, चिखली १, बोरगाव १, धोम १, काशिकपाडी वस्ती १, पाचवड १.  

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १८, कालमगाव २, भिलार १, तळदेव १, पाचगणी ९, गुरेघर १,  तापोळा १, वाकी तापोळा १, गावडोशी १.

जावली तालुका : सनपाने १, कुडाळ ४, पिंपळी १, हातगेघर १, मोरावळे १, भालेघर १, भुतेघर १, गोटेघर १. 

जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदर बझार (सातारा) येथील ५८ वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, मोर्वे (ता. खंडाळा) येथील ७२ वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पटलमध्ये करंजे (ता. जि. पुणे) येथील ५७ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ४०६३२२
  • एकूण बाधित - ६६०६३ 
  • घरी सोडण्यात आलेले - ६०२१७
  • मृत्यू - १९१०
  • उपचारार्थ रुग्ण - ३९३६

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या