Satara News : सातारा शहरालगत लुटमार करणारे जेरबंद


महामार्गावर ट्रकचालकाला लुटून पसार झालेल्या टोळीला काही तासातच पकडले

Satara News : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक वाढे फाटा येथे रविवारी (दि. २५) रात्री दीडच्या सुमारास ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीला सातारा शहर पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. 

सुरज राजू माने (वय २२), तेजस संतोष शिवपालक (वय २१, दोघेही रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा) आणि एका अल्पवयीन मुलाने ट्रकमध्ये घुसून चालक, क्लिनर यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी प्रतिकार केला असता ट्रकचालकाच्या डोक्यात दगड मारुन ट्रकमधील २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. या तिघांना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिले होते.

संशयितांकडून गुन्ह्याची कबुली 

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार संशयित तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या