Satara News : बावधनची बगाड यात्रा ‘दणक्यात’ साजरी


प्रशासनाचे नियम व कोरोनाची दहशत धुडकावत भाविकांचे दु:साहस
 

Satara News : कोरोनाचे थैमान सुरू असताना व त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्राजत्रांच्या बाबतीत निर्बंध घातले असताना वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. यात्रा कमिटी आणि भाविकांनी प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत यात्रा उत्साहात साजरी केली. बगाडाला प्रचंड गर्दी उसळल्याने प्रशासनासह सामान्य नागरिकही चक्रावून गेले आहेत.

बावधनमध्ये कोरोना बधिताची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे - खराडे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

भल्या सकाळी मिरवणुकीस प्रारंभ

प्रशासनाने बावधन व परिसरातील ११ गावामध्ये २७ मार्च ते १४ एप्रिल या काळात जमावबंदीचे आदेश दिले होते. प्रशासनाने बावधनबरोबर फुलेनगर या गावची काळेश्वरी देवीची यात्राही रद्द करण्याचा आदेश दिला होता. मात्र आज भल्या सकाळी मोठ्या उत्साहात बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता काय कारवाई होणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या