बंदी असलेल्या गुटख्याचा खुलेआम ‘बाजार’ स्थानिक गुन्हे शाखेने उठवला
Satara News : सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात बुधवार नाका परिसरात सापळा रचून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा प्रचंड साठा पकडला. यामध्ये हिरा पान मसाल्याची २६ पोती, रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती व बोलेरो जीप असा एकूण १० लाख ५२ हजार ६० रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
एक इसम सातारा शहरात बुधवार पेठेतील त्याच्या राहत्या घरी बोलेरो पिकअप (एमएच ४२ एम ४५१९) मधून हिरा गुटख्याची पोती घेऊन विक्रीकरिता आणणार असल्याची बातमी दि. ४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली होती. बातमीची खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकास दिल्या होत्या.
बोलेरो अलगद आली सापळ्यात
त्यानुसार या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावला असताना दि. ४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संबंधित इसम उपरोक्त क्रमांकाची बोलेरो घेऊन बुधवार नाका येथील राहत्या घरासमोर आला असता पोलीस पथकाने त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून हिरा पान मसाल्याची २६ पोती, रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती व बोलेरो जीप असा एकूण १० लाख ५२ हजार ६० रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
हा माल महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ एप्रिल रोजी सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करणारे एकूण आठजणांवर कारवाई करून २४ हजार ७०६ रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने यांच्यासह कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या