Satara News : जिल्ह्यात रूग्णवाढीचा नवा रेकॉर्ड; २००१ पॉझिटिव्ह


चोवीस तासात ३४ बाधितांचा मृत्यू; आजअखेर बाधित झालेल्यांचा आकडा ९१ हजारांच्या पुढे

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असून गेल्या चोवीस तासात रूग्णवाढीचा आजवरचा उच्चांक झाला आहे. काल रात्री १२ वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २००१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ७६ (४२३९), कराड २४४ (१४४६०), खंडाळा १६२ (५६२९), खटाव ११४ (७५७७), कोरेगाव ११७ (७७४१), माण १७७ (५१४७), महाबळेश्वर ९२ (३०७३), पाटण ११० (३६८९), फलटण २५३ (११५२०), सातारा ३७२ (२११५९), वाई २४९ (७०१४) व इतर ४३९ असे आजअखेर एकूण ९१६८७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मागील २४ तासात व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या

जावली १ (९२), कराड ३ (४०४), खंडाळा ० (७८), खटाव ६ (२२३), कोरेगाव ३ (२१९), माण १ (१२४), महाबळेश्वर १ (२८), पाटण १ (११०), फलटण ३ (१६३), सातारा १२ (६८६), वाई ३ (१६४). जिल्ह्यात आजअखेर एकूण २२९१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या