गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुंडांना जिल्हा पोलीस दलाकडून दणका
Satara News : उंब्रज परिसरात खून, गर्दी - मारामारी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन टोळ्यांतील सात गुंडांना जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
विशाल अशोक दुटाळ (वय २४), किरण आनंदराव पवार (वय २८), अविनाश राजेंद्र पवार (वय २०) व आशितोष गणेश संकपाळ (वय २०, सर्व रा. अंधारवाडी, ता. कराड) यांची एक टोळी आहे. गंभीर दुखापत, गर्दी - मारामारी, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमध्ये या टोळीतील सदस्य गुंतले होते. त्यांना सातारा जिल्हा तसेच सांगलीतील कडेगाव, वाळवा, शिराळा व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
दुसरी टोळी पवन ऊर्फ प्रवीण शामराव साळुंखे (वय ३४, रा. कवठे, ता. सातारा), राजेंद्र ऊर्फ भिकोबा मारुती मसुगडे (वय ३५, रा. नवीन कवठे, ता. कराड), वैâलास तात्याबा चव्हाण (वय ३०, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) यांची आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी - मारामारी, आदेशांचा भंग करणे अशा प्रकारचे गुन्ह्यांत सहभाग होता. या सर्वांना सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
वर्तनात सुधारणा न झाल्याने कारवाई
या दोन्ही टोळ्यांतील गुडांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावा सादर केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या