संकटकाळात सुरू असलेल्या वसुलीविरोधात आंदोलनाचा आम आदमी पक्षाचा इशारा
Satara News : कोरोना संकटाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेला हातातोंडाचा मेळ बसवताना नाकीनऊ येत आहेत. अशा संकटकाळातच फायनान्स कंपन्यांनी कर्जहप्त्याची वसुली सुरू केली आहे. सर्वसामान्य जनतेचा केला जाणारा हा मानसिक छळ तात्काळ थांबविण्यात यावा. अन्यथा आम आदमी पक्षातर्पेâ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सागर भोगावकर यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लावत सगळी दुकाने व आस्थापना बंद केल्या आहेत. परिणामी, नागरिकांची आर्थिक घडी मोडली आहे. आपले व्यवसाय व इतर व्यवहार सुरळीत ठेवण्याकरिता नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेतली आहेत. या निर्बंधांच्या काळातदेखील या कंपन्यांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी तगादा लावला जात आहे. यामुळे कर्जदारांना, विशेषत: बचत गटाच्या माध्यमातून कर्जे घेतलेल्या महिलांना आर्थिक व मानसिक पिळवणुकीचा सामना करावा लागत आहे.
वसुलीसाठी नामचिन गुंडांची नियुक्ती ?
अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना फायनान्स करणाNया कंपन्या वाहनधारकांकडून अवैध पद्धतीने हप्ते वसुली करत आहेत. ही वसुली करण्याकरिता सातारा शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नामचिन गुंडांची फायनान्स कंपन्यांनी नियुक्ती केलेली आहे. हे गुंड आनेवाडी टोलनाका, वाढेफाटा, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी याठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रोज उभे असतात व ते गाड्यांचे हप्ते थकलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून अवैधपणे वसुली करीत असतात. एकप्रकारे ही वाटमारीच आहे. या वसुलीसाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच वसुली करणाNया प्रतिनिधीकडे रिझव्र्ह बँकेच्या नियमानुसार आवश्यक परीक्षा उत्तीर्ण होवून त्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच हप्ते थकलेल्या वाहनाची जप्ती करावयाची असल्यास वाहनधारकाच्या राहत्या पत्त्यावर जावून तसेच त्यांना न्यायालयाची नोटीस व स्थानिक पोलिसांना याबाबतची कल्पना देवून कारवाई करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील फायनान्स कंपन्या कायदा हातात घेवून वाहनधारकांची गेल्या अनेक वर्षांपासून लूट करीत आहेत. ही कायद्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.
कर्जाला मुदतवाढ देण्याची मागणी
जिल्ह्यात दररोज शेकडो गाड्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच इतर ठिकाणी रस्त्यांवर रात्री-अपरात्री अडवल्या जातात व त्यांच्याकडून जबरदस्तीने रोख रक्कमेची व मौल्यवान वस्तूंची लूट केली जाते. अशा नियमबाह्य पद्धतीने वसुली करणाNया फायनान्स कंपन्यांच्या गुंडांवर कडक कारवाई करावी. तसेच जोपर्यंत शासनाचे निर्बंध आहेत व सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत नाहीत, तोपर्यंत कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवून मुदतवाढ देण्यासाठी या फायनान्स कंपन्यांना त्वरित निर्देश व्हावेत, अशी मागणी भोगावकर यांनी केली आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, उत्तमराव सावंत, महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, अॅड. इम्तियाज खान, अॅड. विकास साबळे, आसिफ पठाण, अतुल भोसले, विशाल कोळी, कुलदीप भोगावकर, प्रिया तोरस्कर, दिपेंती चिकणे, शिवाजी जाधव, अॅड. मंगेश महामुलकर, बापू सोरटे, संजय पवार, संदीप माने, डॉ. मधुकर माने, अॅड. विजय खामकर, संजय भोसले, सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या