कोणतेही लक्षण जाणवल्यास टेस्ट करून घेण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन
Satara News : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सातारा शहरासह जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. कोणीही घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला आदी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. दुखणे अंगावर काढल्यास जीवावर बेतण्याचा धोका असून कोणीही कोरोनाबाबत हलगर्जीपणा करून स्वत:चा, कुटुंबीयांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे कळकळीचे आवाहन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असल्या तरी या महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे घाबरून जावून अथवा मला काय होतंय असं समजून दुखणे अंगावर काढण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. अगदी जीवावर बेतल्यानंतर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात आणि मग वेळ निघून गेलेली असते, अशी संख्या खूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना आजारासंबंधी ताप, खोकला, सर्दी आदी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने कोरोनाची टेस्ट करून घेणे आणि त्यावर उपचार सुरु करणे आवश्यक आहे. मगच पुढील धोका टळणार आहे.
दुखणे अंगावर काढणे धोकादायक
लक्षणे असतानाही अनेकजण घरीच बसून दुखणे अंगावर काढतात. यामुळे ते स्वत:च्या आणि घरातील वृद्ध आई - वडील, पत्नीr, मुले यांच्या जीवाशी खेळत असतात. ही बाब अतिशय गंभीर असून एखादे लक्षण जरी जाणवले तरी टेस्ट करून घ्यावी. घरी बसून आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहून स्वत:चा आणि इतरांचा जीव कोणीही धोक्यात घालू नये, असे भावनिक आवाहन करतानाच कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावे आणि स्वत:च्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या