बगाड यात्रेचा अनुभव गाठीशी असल्याने शंभू महादेवाच्या यात्रेसाठी घेतली विशेष दक्षता
Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यात्रेच्या मुख्य दिवशी (दि. २४) शिंगणापूर नगरीवर ड्रोनचीही नजर राहणार आहे.
शिखर शिंगणापुरातील यात्रेचा कालावधी दहा दिवसाचा आहे. यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मानकरी व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार (दि. २४) यात्रेचा मुख्य दिवस आहे. २० एप्रिलपासून धार्मिक विधी सुरू झाले आहेत. यात्रेच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत सर्व शिंगणापूर नगरीवर ड्रोन कॅमेराची करडी नजर असणार आहे. शिंगणापूरमध्ये येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत.
उल्लंघन केल्यास कडक कारवाई
रुढी परंपरेनुसार शिंगणापूरमध्ये कावड - काठ्या आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व कावडींना बंदी असणार आहे. मराठवाडा, विदर्भ व इतर राज्यातून भाविकांनी येऊ नये, असे आवाहन प्रशासन व ग्रामपंचायतीने केले आहे. यात्रा कालावधीत प्रशासनाने घातलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही देण्यात आला आहे. यात्रा बंदोबस्तासाठी एक पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस अधिकारी, ७० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या