चोवीस तासात २४९३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३२ बाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात रोजच रूग्णवाढीचा नवा उच्चांक रचला जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत आहेत. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २४९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३२ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १२८ (४८२४), कराड २१२ (१५७१४), खंडाळा १४४ (६३१५), खटाव ३०९ (८९०६), कोरेगाव २५१ (८६८०), माण १८५ (६१३६), महाबळेश्वर ३५ (३३३९), पाटण १२४ (४२२९), फलटण ३८९ (१३०५९), सातारा ४६६ (२३६१७), वाई २२१ (७८८९ ) व इतर २९ (५७३) असे आजअखेर एकूण १०३२८१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
कोरोना बळींची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१०३), कराड ४ (४३२), खंडाळा ० (८२), खटाव ५ (२५३), कोरेगाव २ (२३३), माण ५ (१४१), महाबळेश्वर १ (३१), पाटण १ (११८), फलटण ३ (१८४), सातारा ७ (७३३), वाई ३ (१८६) असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण २४९६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या