प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कामकाजाबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे सत्कार
Satara News : स्व. अभयसिंहराजे भोसले व सातारा - जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे संचालक मंडळ असलेल्या कुमठे (ता. सातारा) येथील कुमठे विकास सेवा सोसायटी लि. या संस्थेने मार्च महिन्यातच बँक पातळीवर १०० टक्के कर्जवसुली केली आहे.
या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन अरविंद चव्हाण, व्हाईस चेअरमन सुरेंद्र देशपांडे, सचिव संतोष राऊत यांचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या हस्ते, संचालक नितीन (काका) पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, विकास अधिकारी गणेश जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
संचालक मंडळाच्या कार्याची प्रशंसा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कुमठे संस्थेच्या संचालक मंडळाने वसुलीसाठी केलेले कामकाज उल्लेखनीय आहे, अशा शब्दात नितीन पाटील यांनी प्रशंसा केली.
बँकेच्या संचालक मंडळाने शेती कर्जाच्या वसुलीसाठी केलेल्या आवाहनास तसेच विकास सेवा संस्था पंचकमिटी, सचिव व बँकेच्या वसुली यंत्रणेच्या विनंतीस प्रतिसाद देवून जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. याचाच परिणाम म्हणून बँकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षीही शेती कर्जाची ९७ टक्के वसुली करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे, असे प्रदीप विधाते म्हणाले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचेही भाषण झाले.
सभासदांना मिळणार व्याज परतावा
संस्थेच्या सभासदांनी ३१ मार्चपूर्वीच पीक कर्जाची परतफेड केल्याने सभासदांना केंद्र शासनाचा ३ टक्के, राज्य शासनाचा ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. तसेच शासनाच्या व बँकेच्या विविध योजनांचाही सर्व सभासदांना फायदा घेता येणार आहे, अशी माहिती सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी दिली. संस्थेने बँक पातळीवर १०० टक्के कर्जवसुली केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संस्था पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या