Maharashtra News : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यामुळे मिळाला न्याय


बांधकाम कामगार मंडळ हलले; तात्काळ कामगाराच्या खात्यावर रक्कम वर्ग

Maharashtra News : बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगार असुनही पत्नीच्या शस्त्रक्रियेचा खर्च मिळत नसल्यामुळे विवंचनेत असलेल्या दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील बांधकाम कामगारास न्याय मिळवून देण्याचे काम विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले आहे. याबद्दल त्या कामगाराने डॉ. गोर्‍हे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. राहुल लोणकर असे या बांधकाम कामगाराचे नाव आहे.

राहुल लोणकर हा सेंट्रिंगचे काम करतो. गेल्या वर्षी राहुलच्या पत्नीचे सीझर शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण झाले होते. त्याची पत्नी घरकाम करते. राहुल हा बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्याने सीझरचा झालेला खर्च मंडळाच्या वेबसाईटवर टाकला होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला पैसे मिळाले नव्हते. म्हणून त्याने डॉ. नीलम गोर्‍हे यांना संपर्क साधून आपली व्यथा सांगितली. 

सुविधा लवकर देण्याचे निर्देश

त्यामुळे बांधकाम कामगारांच्या प्रश्नांबाबत डॉ. गोर्‍हे यांनी कामगार मंत्री यांच्याबरोबर बैठका घेतल्या. त्यामध्ये बांधकाम कामगारांना मंडळाच्या सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात म्हणून निर्देश दिले होते. त्यानुसार राहुल लोणकर याच्या प्रकरणात डॉ. गोर्‍हे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे मंडळामार्फत २० हजार रूपये लोणकर याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या