Maharashtra News : विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा दीक्षित


राज्य शासनाकडून विश्वकोश मंडळाची पुनर्रचना; अन्य २४ सदस्यांचीही नियुक्ती जाहीर

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्ष तथा प्रमुख संपादकपदी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, व्यासंगी लेखक व नवभारतचे संपादक डॉ. राजा दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य २४ जणांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे शुुक्रवारी (दि. २७) या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल राहणार आहे.

विश्वकोश निर्मिती मंडळाचे याआधीचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी गतवर्षी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. या मंडळाची पुनर्रचना करताना अध्यक्षपदी डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रणेते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतीदिनीच या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. नवभारतच्या माध्यमातून डॉ. राजा दीक्षित यांची विश्वकोश निर्मिती मंडळाशी दीर्घकाळापासून जवळीक राहिली असल्याने त्यांना विश्वकोशाच्या कामाविषयी नेहमीच आत्मीयता राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या संपादकत्वाखाली विश्वकोशाच्या कामाचे मोठेपण जपले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मंडळाचे नवनियुक्त सदस्य

डॉ. भीमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरूण भोसले, राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, सतिश आळेकर, हेमंत राजोपाध्ये, सुबोध जावडेकर, आसाराम लोमटे, डॉ. रवींद्र रुक्मिणी रवींद्रनाथ, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, श्रीमती शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे, श्रीमती प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार, श्रीमती मनिषा उगले, भाऊसाहेब चासकर, प्रा. उल्हास पाटील.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या