Mahavitaran News : महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण


कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस त्वरित उपलब्ध करून द्यावी यासाठी पाठपुरावा

Mahavitaran News : गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महावितरणच्या ३५ हजार ६०० (४७ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी स्थानिक जिल्हा व पालिका प्रशासनासोबत समन्वय साधावा व लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सद्यस्थितीत प्रामुख्याने घरूनच काम सुरु असल्याने घरगुतीसह कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे कर्मचारी बाधित होण्याच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ६०० (४७ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे ६ हजार ५६२ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ४ हजार १३२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या २ हजार २२१ कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरु आहेत, अशी माहिती सिंघल यांनी दिली.

शासकीय यंत्रणांकडे युद्धपातळीवर पाठपुरावा

कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी सिंघल यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुख्यालयाकडून कोविड संबंधीत सर्व शासकीय यंत्रणांकडे युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये समन्वय कक्ष कार्यान्वित झाले आहेत. या कक्षांद्वारे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना, कुटुंबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थाने तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. दिले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या