Marashtra News : साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे


मराठी भाषा विभागातर्फे नियुक्त्या जाहीर; डॉ. मोरे यांच्यासह ३० जणांचा समावेश

Marashtra News : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मंंडळाची पुनर्रचना करताना डॉ. मोरे यांच्यासह ३० सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंतच्या कालावधीसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

मंडळाचे नवनियुक्त सदस्य

डॉ. प्रज्ञा दया पवार, अरूण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती नीरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, कवी फ. मुं. शिंदे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रवींद्र शोभणे, योगेंद्र ठावूâर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा. एल. बी. पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रवींद्र बेडकिहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर यांची नियुक्ती झाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या