Maratha Reservation News : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द


पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल; मराठा समाजाला मोठा धक्का

Maratha Reservation News : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने आज हा ऐतिहासिक निकाल दिला. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही फेटाळल्या आहेत. या निकालाने मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न सर्वांच्या मुखात आहे.

शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी आधीच्या फडणवीस सरकारने घेतला होता. हे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल अशा पध्दतीने त्याचा मसुदा केला असल्याचे तत्कालिन नेते छातीठोकपणे सांगत होते. मात्र, काही लोकांनी या आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तथापि, या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम

मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे त्याकडे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण तसेच न्यायमूर्ती नाझीर, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण मोठ्या बेंचकडे सोपवण्याची गरज नाही. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली. हा निकाल दुर्दैवी असून मराठा समाजाला या निर्णयामुळे धक्का बसला आहे. या निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या