राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील सुसंस्कृत नेतृत्व हरपले
Politics News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील अभ्यासू, सुसंस्कृत नेते, राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज निधन झाले. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची झुंज व्यर्थ ठरली. त्यांच्या अकाली निधनाने केवळ हिंगोलीच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.
खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. गेल्या 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे लवकरच त्यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळेल अशी आशा होती. मात्र, ते कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता. शरीरात या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर सायटोमॅगीलोनं ग्रासल्याने त्यांचे निधन झाले.
हक्काचा माणूस गमावला - वडेट्टीवार
'राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील असे त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणे त्यांच्या रक्तात होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचे मार्गदर्शन लाभायचे. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जावून त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या