Satara Breaking News : जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला


कोरोना पॉझिटिव्हचा दर अपेक्षित प्रमाणात कमी न आल्यामुळे मुदतवाढ
 

Satara Breaking News : सातारा जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कोरोना पॉझिटिव्हचा दर ज्या अपेक्षित प्रमाणात कमी न आल्यामुळे लॉकडाऊनची मुदत आणखी पाच दिवस वाढवण्यात आली असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने ४ ते १० मे अखेर कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. तेव्हापासून दररोजची समाधानकारकरीत्या कमी झालेली नसली तरी पॉझिटिव्ह दर ज्या प्रमाणात कमी येणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात कमी आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन कडक पध्दतीने पाळावा लागणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

किराणा, दूध, भाजीपाला बंदच

लॉकडाऊनची मुदत वाढवल्याच्या संबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. त्यानुसार किराणा, दूध, भाजीपाला इत्यादी सेवा १५ तारखेपर्यंत बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आटोक्यात येण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन करणे गरजेचे आहे. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या