सातारा येथील दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी
Satara Breaking News : सातारा येथील दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पाटण तालुक्यातील तारळे येथे छापा टाकून बेकायदेशीररीत्या ठेवलेला जिलेटिनच्या कांड्या व डीटोनेटर्स असा स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला. याप्रकरणी गोविंदसिंग राजपुत (यादव) या इसमाविरुध्द उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून स्फोटके तसेच बोलेरो जीप असा ३ लाख ९ हजार ४५३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना पाटण तालुक्यातील तारळे परिसरात बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थांचा साठा होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) बुधवारी (दि. १२) तारळे परिसरात गोपनीय माहितीची खात्री करुन तारळे येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याने राहत्या घरी बेकायदेशीर स्फोटक पदार्थांचा साठा ठेवल्याची गोपनीय माहिती असल्याने त्याच्या घराची व आसपासच्या परिसराची झडती घेतली.
शौचालयात लपवली होती बॉक्स
त्यावेळी घराच्या पाठीमागील पत्र्याच्या कुलुपबंद शौचालयामध्ये खाकी रंगाचे चार बॉक्स आढळून आले. त्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. तसेच त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या पांढन्या रंगाच्या बोलेरो या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागील बाजुस सीटच्या खाली एका निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये २९ जिलेटीनच्या कांड्या व दुसऱ्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये २७ डीटोनेटर्स वायरसह आढळून आले.
तीन लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त
या संबंधाने दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस नाईक सागर तानाजी भोसले यांनी यातील आरोपीविरुध्द स्वत:च्या व लोकांच्या जीवित व मालमत्तेस गंभीर धोका पोहोचू शकतो याची जाणीव असतानाही अधिकृत परवानगीशिवाय स्फोटकांचा बेकायदा साठा स्वत:जवळ बाळगून लोकवस्तीमध्ये ठेवला म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन उंब्रज पोलीस ठाण्यात गोविंदसिंग राजपुत याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये एवूâण ९ हजार ४५३ रुपये किंमतीच्या एकूण ८३६ जिलेटीनच्या कांड्या (स्फोटक पदार्थ वजन अंदाजे १०३ किलो), ३ लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडी असा एकूण ३ लाख ९ हजार ४५३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा, सातारा व दहशतवाद विरोधी कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोरे, अनिकेत अहिवळे, केतन जाधव, निलेश बच्छाव हे या कारवाईत सहभागी झाले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या