Satara News : बँका - पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लस


सहकार आयुक्तांच्या आदेशाकडे होत होता कानाडोळा; आता पालकमंत्र्यांनी दिले आदेश

Satara News : कोरोनाच्या संकटात कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले असून त्यांचे लसीकरण करण्यात यावे याबाबत राज्य सहकार आयुक्तांनी २० एप्रिल रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. परंतु सातारा जिल्ह्यात याबाबत कार्यवाही न झाल्याने सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पालकमंत्री, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला होता. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, कोरोनाच्या संकटात प्रंâटलाईन कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. त्यांना फिल्डवर राहूनच लोकांना सेवा द्यावी लागली आहे. दुर्दैवाने केंद्र आणि राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांचा लसीकरण कार्यक्रमात समावेश केला, परंतु बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांना सापत्न वागणूक दिली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. राज्य सरकारच्या ब्रेक दि चेन आदेशान्वये सर्व बँका व पतसंस्था आजही कार्यरत आहेत. सहकारी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडीत असल्याने यामधील कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सामान्य जनतेशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहकारी बँका व पतसंस्था या राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असल्याने त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी दि. २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत आदेश दिले आहेत.

आंदोलनाच्या इशाऱ्याची पालकमंत्र्यांकडून दखल 

त्या आदेशाची सातारा जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. याबाबत चार दिवसात निर्णय न झाल्यास बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचारी व संचालकांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची पालकमंत्री व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या