उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करुन दिलासा देण्याचे आढावा बैठकीत आवाहन
Satara News : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बँकांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी याप्रसंगी केल्या.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात खरीप हंगाम २०२१ पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मरकंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
अनेकांचा मृत्यू कोरोनाच्या भीतीने
खरीप हंगाम २०२१ मध्ये कर्जाची मागणी केलेल्या शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. कोरोनाची लक्षणे असल्याचे लक्षात आल्याने घाबरुन काही नागरिकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंपाचे वीज कनेक्शन प्रलंबित आहेत. त्यांचे वीज कनेक्शन लवकरात लवकर द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या.
वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशन
जिल्हा अग्रणी बँकेने तयार केलेल्या ९ हजार २७५ कोटीच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या