कौटुंबिक वादातून आईकडे राहिलेल्या मुलाचा जीव घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
Satara News : कौटुंबिक कलहातून आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिवराज संतोष भिंगारे (वय ८) असे खून झालेल्या मुलाचे, तर संतोष लक्ष्मण भिंगारे (वय ३५, सध्या रा. पाचवड, ता. वाई, मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा मिळालेल्या पित्याचे नाव आहे.
संतोष याचा वैशाली यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. पती - पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. त्यामुळे वैशाली मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहत होती, तर संतोष पाचवड येथे राहात होता. शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. ४ मार्च २०१७ ला संतोषने शिवराजच्या शाळेत जावून त्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्याला भुईंजमध्ये आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना याबाबत माहिती दिली. तिने ही माहिती कडेगाव पोलिसांना दिली.
जिल्हा न्यायालयाचा निकाल
दरम्यान, भुईंजमध्ये आल्यावर त्याने शिवराजला विष पाजले. त्यानंतर स्वत: विष पिऊन याबाबत फोनवरून पत्नीला माहिती दिली. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० मार्च २०१७ ला शिवराजचा मृत्यू झाला. याबाबत वैशाली यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. साक्षीदारांच्या साक्षी व सहाय्यक सरकारी वकील अॅड. नितीन मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सावंत यांनी संतोषला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या