पहिली लस घेऊन ८४ दिवस न झालेल्यांना केंंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन
Satara News : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशिल्ड या लसीचा पाहिला डोस घेतला आहे, त्यांना दि. १५ मे पासून कोविशिल्डचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन अॅपमध्ये दि. १४ मे च्या मध्यरात्रीपासून करण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
कोवॅक्सिनच्या पहिल्या व दुसऱ्या डोसच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसून त्याचे लसीकरण पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी ज्यांचा कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेवून ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी दुसरा डोस घेण्याकरिता लसीकरण केंद्रावर जावे. परंतु ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांनी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहनही डॉ. आठल्ये यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या