Satara News : देशमुखनगर येथे देशी दारूचा साठा पकडला


स्थानिक गुन्हे शाखेची रविवारी पहाटे कारवाई; १.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara News : सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे सापळा रचून एक मारूती झेन (एमएच ०४ सीबी ०९०६) कार पकडून ३७ हजार ४४० रूपये किंमतीचा देशी दारूचा साठा व इतर मिळून १ लाख ३७ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारमधील संशयिताविरूध्द बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पकडलेला माल कराड येथील एका वाईन शॉप मालकाकडून खरेदी करुन आणला असल्याची कबुली त्याने दिली आहे.

याबाबतचे वृत्त असे, देशमुखनगर येथे एक इसम मारुती झेन कारमधून देशी दारु विक्रीकरिता घेवून येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. हे पथक देशमुखनगर येथे जावून सापळा लावून थांबले असताना पहाटे दोनच्या सुमारास देशमुखनगर येथील चौकामध्ये बातमीतील मारुती झेन कार एक इसम घेवून आला. ती कार पकडली असता त्यामध्ये ३७ हजार ४४० रुपये किंमतीचे देशी दारुचे बॉक्स मिळून आले. कारमधील इसमाच्या ताब्यातून देशी दारुचा माल व इतर माल असा एवूâण १ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, कांतीलाल नवघणे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, चालक गणेश कचरे यांनी ही कारवाई केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या