‘आपला माणूस’ उच्च पदावर गेल्यावर मदतीसाठी धावला आपल्या माणसांंच्या
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाच आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला आणखी २७ एमबीबीएस डॉक्टरांची टीम मिळाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ६६ एमबीबीएस डॉक्टर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा मजबूत होण्यास मदत झाली. डॉक्टरांची संख्या वाढल्याने रुग्णांना आणखी जलद आणि चांगल्या प्रकारे सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या संकटाशी गेल्या सव्वा वर्षांपासून तोकड्या यंत्रणेसह सामना करावा लागत आहे. बाधित व मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह कर्मचाNयांच्या जागा गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे ही उणीव प्रकर्षाने जाणवली. रोजचे बाधित वाढत असल्याने आरोग्य विभागावर कमालीचा ताण वाढत आहे. एकीकडे दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असताना डॉक्टर आणि कर्मचाNयांची कमतरता कायम जाणवत होती.
वाढीव मनुष्यबळासाठी वरिष्ठांकडे आग्रह
सातारचे सुपुत्र डॉ. संजोग कदम यांनी आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ अधिकाNयांकडे सातारा जिल्ह्यात मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत आग्रह धरला होता. पंधरा दिवसापूर्वी पुणे येथे संजोग कदम यांनी बैठक घेऊन सातारा जिल्ह्यात तातडीने ३२ डॉक्टर उपलब्ध करून दिले. त्यानंतर ७ आणि नुकतीच २७ एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक केली. ५ ग्रामीण रुग्णालय तर २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी असणार असून दोन दिवसात ते पदभार स्वीकारणार आहेत. वर्षभर जिल्ह्यात सेवा करणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या