सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
Satara News : सातारा तालुक्यातील रामनगर येथे रस्त्याच्या वादातून झालेल्या मारामारी प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
विक्रम मिठारे यांच्या फिर्यादीनुसार प्रकाश विजय काळे, अनिल विजय काळे (दोघे रा. रामनगर), बैजू लाभू काळे, अदिक बैजू काळे, एकनाथ बैजू काळे (सर्व रा. आळंदी, पुणे), सध्या विक्रम काळे (रा. सारोळे, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत मी व मुलगा अजय जखमी झाले आहोत, तसेच दुसरा मुलगा किरण याला कोंडवे गावच्या हद्दीत अडवून मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बैजू काळे व अदिक काळे यांना अटक केली आहे. हवालदार महेंद्र पाटोळे तपास करत आहेत.
जाब विचारल्यावरुन मारहाण
दुसरी तक्रार बैजू लाभू काळे (रा. आळंदी, पुणे) यांनी दिली आहे. रामनगर येथे विजय काळे यांच्या घरासमोर घरातील लोकांसमवेत उभा होतो. त्यावेळी चुलतभाऊ प्रकाश व स्नेहा मिठारे यांच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणातून अनिल बकू मिठारे याने मला व मुलाला दगड मारून जखमी केले. याचा जाब विचारल्यावरुन पप्पू उर्फ किरण मिठारे, अजय मिठारे, अनिल मिठारे (सर्व रा. रामनगर) यांनी मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार कदम तपास करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या