बँकिंग फ्रंटियर्सकडून 'सर्वोत्कृष्ट डिजीटल जिल्हा बँक' म्हणूनही सन्मान
Satara News : बँकिंग फ्रंटियर्स ही बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य व मल्टी प्लॅटफॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेवून त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस 'सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक' व 'सर्वोत्कृष्ट डिजीटल जिल्हा सहकारी बँक' हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्था, बँकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रांना अडचणी निर्माण झाल्या. या अडचणींवर मात करत सातारा जिल्हा बँकेने उल्लेखनीय कामगिरी करत बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून बँकेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे सलग सहा व महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को - ऑप. बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध ९४ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सेवेचे जाळे तळागाळातील घटकांपर्यंत
यावेळी संचालक व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने सेवेचे जाळे तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविले असून ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजामुळेच बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये 'सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक' म्हणून बँकेची नोंद झालेली आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बँकेचे संचालक आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, दत्तात्रय ढमाळ, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील (वाठारकर), अनिल देसाई, प्रकाश बडेकर, अर्जूनराव खाडे, प्रदिप विधाते, वसंतराव मानकुमरे, संचालिका कांचन साळुंखे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे संचालक मंडळाने अभिनंदन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या