Satara News : ‘काशिळ’च्या प्रॉपर्टीवरून घडला ‘अपराध’


कोल्हापुरी पाहुण्यांची काशिळच्या माळावरच जुंपली; दोघेजण जखमी
 

Satara News : सातारा तालुक्यातील काशिळ येथे शेतजमिनीच्या कारणावरून जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत अभिजीत जयवंतराव आडनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काशिळ येथे पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत त्यांचे मामा विक्रमसिंह अपराध (कोल्हापूर) यांची १११७/१ व १११८/१ अशी शेतजमीन आहे. त्यापैकी १११८/१ हा संपूर्ण गट मामा विक्रमसिंह अपराध यांनी नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावे केली आहे. १११७/१ या गटातील तात्या रामू कोळेकर यांची साडेपाच गुंठे जमीनही खरेदी केली आहे. सकाळी अभिजित आडनाईक हे काशीळ येथील त्यांच्या जमिनीची पाहणी करताना विशाल राजेंद्र भुसावलीया (रा. दीप्ती पॅलेस कॉलनी, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) व गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्यांच्या जमिनीत बेकायदेशीररीत्या येऊन 'तुझे येथे काही नाही, तू येथे यायचे नाहीस, नाहीतर तुझे हातपाय तोडेन' अशी धमकी देत दोघांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यावेळी विशाल भुसावलीया याने तेथे पडलेला लोखंडी अँगल घेऊन त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले.

चौकशीकामी निघाले असता हाणामारी

विशाल राजेंद्र भुसावलीया यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काशिळ येथील गट नं. १११७/१ ही शेतजमीन विक्रमसिंह अपराध यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी व विक्रमसिंह अपराध यांची मुलगी स्वाती भुसावलीया यांच्या नावे झाली आहे. या शेतजमिनीसंदर्भात असलेल्या तक्रारीबाबत नागठाणे (ता. सातारा) येथील सर्कल कार्यालयात चौकशी सुरू आहे.

सकाळी याच चौकशीकामी ते व चालक गोविंद वराडकर हे कोल्हापूरहून नागठाणे येथे निघाले. वाटेतच त्यांची शेतजमीन असल्याने ते काशिळ येथे १११७/१ शेतजमिनीत गेले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अभिजीत जयवंतराव आडनाईक (रा. शिवतेज फार्म, काशीळ, ता. सातारा) याने 'तुझा येथे यायचा काय संबंध, तू येथे यायचे नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या लोखंडी अँगलने मारण्यास सुरुवात केली. यामध्ये विशाल भुसावलीया हे जखमी झाले. दोघांनी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, पोलिसांनी विशाल राजेंद्र भुसावलीया, गणेश वराडकर व अभिजित जयवंतराव आडनाईक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या