पॉझिटिव्ह आणि मृत्यूदरही आटोक्यात येईना; आणखी ३८ बाधितांचा बळी
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८८० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३८ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली आहे.
मागील चोवीस तासात पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांचा आकडा पाहून अनेकांना हायसे वाटले असेल, परंतु या चोवीस तासात कोरोना चाचण्या १९२० झाल्या असून पॉझिटिव्ह दर ४५.८९ इतका आहे. कदाचित वादळ, पाऊस यामुळे चाचण्या कमी झाल्या असाव्यात. त्याआधीच्या चोवीस तासात कोरोना चाचण्या ५४७१ झाल्या आहेत. त्यामध्ये १७७८ जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह दर ३२.५० इतका आहे. चाचण्यांपेक्षा पॉझिटिव्ह दर घटल्यास जिल्ह्याला खNया अर्थाने दिलासा मिळेल.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २४ (६५१४), कराड ६५ (१९५८९), खंडाळा ३९ (८५०४), खटाव ९३ (१२२१८), कोरेगाव ३३ (११७४४), माण २७ (९२५५), महाबळेश्वर ३० (३७३९), पाटण १७ (५६७६), फलटण २४० (१८३८८), सातारा २४२ (३०८४३), वाई ६० (१०१३० ) व इतर १० (८२४) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ३७ हजार ४२४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१४३), कराड ८ (५६५), खंडाळा १ (१०९), खटाव ८ (३४१), कोरेगाव ६ (२८०), माण ३ (१८२), महाबळेश्वर ० (४१), पाटण ० (१४१), फलटण ० (२३२), सातारा ८ (९१८), वाई २ (२७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३२२३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या