Satara News : रूग्णसंख्येत चढउतार; जिल्हावासीयांचा जीव खालवर


जिल्ह्यात चोवीस तासात वाढले १७९२ रूग्ण; आणखी ३४ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णसंख्येत चढउतार होत असून मृत्यूचे तांडवही सुरूच आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये कमालीची अस्वस्थता पहायला मिळत आहे. जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १७९२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.

बाधितांची तालुकानिहाय आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ५१ (६७४४), कराड १८५ (२००२०), खंडाळा १०९ (८७७३), खटाव १५८ (१२७१९), कोरेगाव २०८ (१२३९७), माण १३७ (९६९३), महाबळेश्वर ६ (३८१३), पाटण ६६ (५८७९), फलटण ३४२ (१९६१९), सातारा ३४२ (३१९४०), वाई १७६ (१०५८२) व इतर १२ (८८२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ४३ हजार ६१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची तालुकानिहाय आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१४७), कराड ८ (५८४), खंडाळा १ (११६), खटाव ४ (३५६), कोरेगाव २ (२८८), माण ६ (१९०), महाबळेश्वर ० (४१), पाटण १ (१४४), फलटण ० (२३८), सातारा ९ (९४२), वाई ३ (२८२) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३३२८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या