मुंबई, पुणे आटोक्यात यायला लागले तरी सातारा जिल्ह्यात स्थिती नाजूक
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८७५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी ही माहिती दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ५३ (६७९७), कराड २४८ (२०२६८), खंडाळा ९८ (८८७१), खटाव २६० (१२९७९), कोरेगाव १५६ (१२५५३), माण ११७ (९८१०), महाबळेश्वर १३ (३८२६), पाटण ६३ (५९४२), फलटण ३७२ (१९९५१), सातारा ३९४ (३२२८१), वाई ८२ (१०६६४ ) व इतर १९ (९०१) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ४४ हजार ८४३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१४८), कराड ३ (५८७), खंडाळा ६ (१२२), खटाव ४ (३६०), कोरेगाव २ (२९०), माण १ (१९१), महाबळेश्वर १ (४२), पाटण १ (१४५), फलटण १ (२३९), सातारा ८ (९५०), वाई ३ (२८५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३३५९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
संकटकाळात जनता वाऱ्यावर
मुंबई, पुण्यासारख्या महानगरात कोरोनाला आळा घालण्यात यश येत असताना सातारा जिल्ह्यात कोरोना का आटोक्यात येत नाही हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. दोष प्रशासनात आहे, की आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे याचा शोध नव्हे, तर समाचार राज्य शासनाने घ्यावा अशी मागणी जिल्हावासीय करत आहेत. कारण या संपूर्ण संकटकाळात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोणाला जुमानत नसल्याचा अनुभव जनता घेत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या