सातारा तालुक्यातील नांदगावची हृदयद्रावक घटना; सातारा येथे अंत्यसंस्कार
Satara News : सातारा तालुक्यातील नांदगावचे सुपुत्र, महाबीजचे सेवानिवृत्त अधिकारी रणजितसिंह देशमुख (वय ६६) यांचे लिव्हरच्या आजाराने सातारा येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पत्नी वर्षा यांना समजताच त्यांच्या वियोगाने अवघ्या पंधरा मिनिटात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचेही निधन झाले. उभयतांच्या निधनाने नांदगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मुंबई येथील प्रतिथयश उद्योगपती प्रतापसिंह देशमुख यांचे बंधू असलेल्या रणजितसिंह यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेतले. एक प्रामाणिक, सर्वसामान्यांना न्याय देणारा आधिकारी अशी त्यांची ख्याती होती. लिव्हरचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथील मंगेशकर रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सातारा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
निधनाच्या वृत्ताने पंचक्रोशीवर शोककळा
२८ मे रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी वर्षा देशमुख (वय ६१) यांना पतीच्या निधनाची माहिती मिळताच पतीच्या वियोगाने अवघ्या पंधरा मिनिटात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचेही निधन झाले. सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे यांच्या त्या बहिण होत. सुस्वभावी व सर्वांच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या देशमुख दांपत्याच्या निधनाच्या वृत्ताने पंचक्रोशीसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा येथील कैलास स्मशानभूमीत त्यांची मुलगी संयोगिता देशमुख हिने आई-वडिलांच्या चितेला भडाग्नि दिला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या