सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयिताला तात्काळ अटक
Satara News : अल्पवयीन मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिला वारंवार त्रास देऊन तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिच्या घरच्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संगमनगर येथील युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली आहे. प्रकाश लक्ष्मण राऊत असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
पीडित १६ वर्षीय मुलगी सातारा तालुक्यातील एका गावात राहते. प्रकाश लक्ष्मण राऊत (वय २५, रा. गुरुदत्त कॉलनी, संगमनगर) हा सातत्याने तिच्या घराशेजारी जायचा आणि तिच्याशी वेगवेगळ्या मार्गाने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने मुलीच्या मागे तगादा लावला होता. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिला. तरीही प्रकाश तिचा वारंवार पाठलाग करत होता. पीडित अल्पवयीन मुलगी प्रकाशला सातत्याने नकार देत असल्यामुळे दोघांचे जुने फोटो सोशल मीडियावर अपलोड करून मुलीच्या घरच्यांची बदनामी करण्याचा तो प्रयत्न करीत होता.
त्रासाला कंटाळून तक्रार दाखल
दरम्यान, प्रकाशकडून सातत्याने त्रास देण्याचा प्रकार सुरू राहिल्यामुळे पीडित मुलीने त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या