बाधितांना आरोग्यवर्धक काढा, गरजुंना अन्नदान, सॅनिटायझर व मास्कचे वाटप
Satara News : आपले वडील लक्ष्मणराव नाना महामुलकर यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम आणि खर्चास फाटा देत वडिलांची समाजाप्रती असलेली दातृत्वाची शिकवण पुढे नेण्याच्या विचाराने विलासपूर (सातारा) येथील ज्ञानेश्वर आणि बाळासाहेब महामुलकर यांनी प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक कर्तव्य आणि बांधिलकी म्हणून त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचा अनेकांना लाभ होत असून लोक त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
महामुलकर कुटुंबियांच्या वतीने गोडोली येथे कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्री साई आयसोलेशन सेंटर तसेच विसावा नाका येथील पुष्कर कोविड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना आरोग्यवर्धक काढा पावडर तसेच घरातील महिलांनी बनवलेले पोळीभाजीचे फूड पॅकेट, पाणी बॉटल, सॅनिटायझर आणि एन ९५ मास्क देण्यात आले. याबरोबरच या संकटात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना, भाजी-फळे विक्रेत्यांना, घंटागाडीवरील लोकांना, एमआयडीसीतील मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना, सुरक्षारक्षकांना, वाहतूक पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
उपक्रमाचे अनेकांनी केले कौतुक
पूर परिस्थितीत आणि मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतही समाजासाठी काही ना काही मदत करण्याचा पायंडा पुढे चालवताना आजोबांच्या प्रती असलेली आपुलकी म्हणून त्यांचे नातू मयूर महामुलकर आणि अरिंजय महामुलकर या बंधूंनी पुढे होऊन या मदतीचे वाटप केले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या