नवे बाधित २३६४, बळी ३३; घरात उपासमारीची आणि बाहेर कोरोनाची भीती
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून रात्री १२ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार आणखी २३६४ रूग्णांची भर पडली आहे. तसेच कालपासून ३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचे व मृतांचे आकडे झपाट्याने वाढत चालले असून सर्वसामान्य जनतेची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे.
इतके दिवस लॉकडाऊन असुनही रूग्णवाढीचे आकडे कमी होत नसल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. शिवाय उद्योजक, व्यावसायिक यांच्यापासून सर्वच घटक मेटाकुटीला आले आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल तर पहावत नाहीत. घरात बसून हातातोंडाची गाठ पडेना आणि बाहेर पडावे तर पोलीस सोडेना अशी अवस्था असल्याने अस्वस्थता धुमसत आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ६६ (७०४५), कराड ३०२ (२१०८२), खंडाळा २२८ (९७२१), खटाव ३५९ (१४३७३), कोरेगाव १३३ (१३३०२), माण १९२ (१०४८४), महाबळेश्वर ११ (३९००), पाटण ५४ (६२४३), फलटण ५६२ (२१६७९), सातारा ३१६ (३३५४९), वाई ११६ (१११५१ ) व इतर २५ (९७७) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ५३ हजार ५०६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ४ (१६२), कराड ६ (६०८), खंडाळा २ (१२६), खटाव ७ (३८८), कोरेगाव १ (३००), माण २ (१९७), महाबळेश्वर ० (४२), पाटण १ (१५१), फलटण ० (२४२), सातारा ८ (९७९), वाई २ (२९४) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४८९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या