Satara News : सामाजिक बांधिलकीतून सातारकरांकडून भुकेल्याला अन्न


कोरोनाच्या संकटात जोपासली जातेय माणुसकी; इतरांनी हातभार लावण्याची गरज

Satara News : भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी ही आपली संस्कृती आहे. सातारा शहरातील विविध समविचारी संघटनांच्या कार्यकत्र्यांनी याच भावनेतून एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा रुग्णालय व जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना दोनवेळचे जेवण मोफत देण्याचे मानवतावादी काम ते करत आहेत.

जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे प्रत्येकजण आपल्या जवळच्या बाधित रूग्णाच्या काळजीने हवालदिल आहे. आपल्या रुग्णास लगोलग आपल्याजवळील पुंजीची काळजी न करता शासकीय रुग्णालय तथा जंबो कोविड सेंटरमध्ये ते दाखल करतात. रुग्णाच्या काळजीमुळे आणि गाव लांब असल्यामुळे त्यांना तेथून कोठेही जाता येत नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद. त्यामुळे पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो.

अन्नदान उपक्रमास मदतीचे आवाहन 

अशा या नातेवाईकांसाठी सातारा येथील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून सामाजिक दायित्व समजून या नातेवाईकांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडून दिवसभरात जेवणाचे जवळपास शंभर डबे दिले जात आहेत. त्यामुळे संकटात असलेल्या या नातेवाईकांच्या मुखात अन्न जात आहे, तेही अगदी मोफत. या दातृत्वाने बाधितांचे नातलग सद्गदित होत दिसत आहेत. काहीजण या सेवेसाठी पैसे देवू करतात. मात्र, त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे भान ठेवत हे दानशूर त्यांच्याकडून विनम्रतेने पैसे नाकारतात. मात्र, त्यांची पदरमोडही किती दिवस चालणार? यासाठी सातारा शहर व परिसरातील दानशुरांनी जर या चांगल्या उपक्रमात खारीचाही वाटा उचलला तरी आहे त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे स्फुरण या वीरांच्या अंगी संचारेल व ते आणखी रुग्णसेवा करतील. या उपक्रमाबाबत अधिक माहिती हवी असल्यास युवराज पवार (९८५०११२९१२), सागर भोगांवकर (९८५०५०१२८३), संजय पवार (९९२११३२९०६), महेंद्र बाचल (९९२३१०२८३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमास संदीप जगताप, राहुल बहुलेकर, संदीप माने, दीपक गडकरी, कुलदीप भोगांवकर, सुनिता चिकणे, शंकर गावडे, दीपक शिंदे, महेंद्र जाधव (पिंटूशेठ), राहुल शेडगे, प्रशांत बारटक्के, अ‍ॅड. इम्तियाज खान, विजयकुमार धोतमल यांच्यासह देवदूत फौंडेशन, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हॉकर्स संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या