Satara News : अभयसिंहराजे यांना जयंतीदिनी जिल्हा बँकेत अभिवादन


भाऊसाहेब महाराजांनी तळागाळातील लोकांसाठी जीवन समर्पित केले - शिवेंद्रसिंहराजे

Satara News : सातारा जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक परंपरेत स्वकर्तृत्वाची मुद्रा उमटविणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारी मंत्री व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, विकासरत्न स्व. आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांची जयंती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून भाऊसाहेब महाराजांनी सहकार क्रांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोरगरीब, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणत बळीराजाला सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम केले. सहकार मंत्री असताना त्यांनी राज्यातील सहकार क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम केले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर आणि भाऊसाहेब महाराजांच्या विचारधारेवर संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

तालुक्याच्या विकासात अनमोल योगदान

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, विना सहकार नाही उद्धार हे ओळखून भाऊसाहेब महाराजांनी सहकारात क्रांती घडवली. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व सूतगिरणीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. भाऊसाहेब महाराजांनी राजकारणात सक्रीय राहून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले. तालुक्यात ठिकठिकाणी बंधारे बांधून पक्क्या रस्त्यांनी गावे जोडून प्रत्येक गावाला विकास प्रवाहात आणले. अजिंक्य उद्योग समुहाची उभारणी करण्याबरोबरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्रीन हाऊस उभारणीस चालना दिली. उत्पादित फुले व भाजीपाल्यास अजिंक्य फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संघाची स्थापना करून देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. उच्च तांत्रिक शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकेत हायटेक कृषी विभागाची स्थापना केली.

यावेळी बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक प्रकाश बडेकर, संचालिका कांचनताई साळुंखे यांनी भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, विविध विभागाचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या