ग्रामस्तरावरील विकासावर विपरित परिणाम होत असल्याने दिली मान्यता
Satara News : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामसभा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्तरावरील विकासावर विपरित परिणाम होत असून कोणताही निर्णय घेण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सध्या सर्व सभा ऑनलाइन होत असल्याने आता ग्रामसभाही ऑनलाइन घेण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.
कोरोनाच्या विळख्यात ग्रामसभाही अडकल्याने अनेक निर्णय रखडले होते. तीन महिन्यातून एक ग्रामसभा, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशी ग्रामसभा बंधनकारक असतात. ग्रामसभांना विशेष अधिकार असल्याने गावाच्या विकासाच्या दृष्टीने या सभा होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्रामसभा घेण्यात अडचणी येत होत्या.
विशेष बाब म्हणून मान्यता
सन २०२१ - २२ चा वार्षिक कृती आराखडा मंजूर होणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून शासनाने ऑनलाइन ग्रामसभांना मान्यता दिली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत सर्व कार्यालयांमध्ये बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. याच धर्तीवर ग्रामपंचायतीची गणसंख्या पूर्ण झाल्यानंतर वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी ऑनलाइन ग्रामसभेची आवश्यक ती तयारी करून कार्यवाही करावी. ग्रामसभा घेण्याबाबत कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा गौडा यांनी दिला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या